जय हरी विठ्ठल च्या गजरात चांदुरबाजार वारकऱ्यांची पहिली बस रवाना करण्यात आली

कोरोनामुळे मागील २ वर्षांपासून वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी  जाऊ शकले नाही. यंदा वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत.  लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शना साठी पाई जातात या निघणाऱ्या ‘पंढरपूर वारी’ला (Pandharpur Wari) जुनी परंपरा लाभलेली आहे.महाराष्ट्रमध्ये ‘आषाढी एकादशी’ला विशेष महत्त्व आहे. यंदा आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi)  रविवारी 10 जुलै 2022 रोजी आहे. विठूरायला भेटायची आस आणि मुखी विठ्ठू नामाचा जप करत, विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध झालेले वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे.

चांदुरबाजार : आगामी आषाढी एकादशीच्या पार्शभूमीवर वारकरी समुदायिकांनी आपले पाऊले पंढरपूरच्या वाटेकडे आपली पाऊले टाकताना दिसत आहे व त्यांच्या पंढरपूर वारीच्या सुरक्षित वारीसाठी महाराष्ट्रातील एसटी मंडळानेहि वारकरी समुदायिकांच्या समस्यांचे निराकरण करताना दिसत आहे.

या साठी अमरावती जिल्ह्यातील सर्व अगरप्रमुकानी वारकऱ्यांसाठी एसटी बसची सोय  करून देण्यात आली त्याच पार्शभूमीवर शनिवारी ता. चांदुरबाजार आगारातून पहिली बस रवाना  करण्यात आली.

chandur bazar

यात चांदुरबाजार तालुक्यातील ३२ वारकऱ्यांचा समावेश होता चांदूरबाजार आगारातून शनिवारी स.११. ३० वाजता वारकऱ्यांच्या पहिल्या ४४सीटर बस क्र यस.यस.४० एक्यु ६२८२ या बसचे प्रहार शेतकरी तसेच जिल्हाअध्यक्ष मा. मंगेश देशमुख व भाजपचे तालुका अध्यक्ष मा. मुरली माकोडे तसेच ठाणेदार साहेब सुनील किनगे यांनी विधी विधानाने पूजन केले. या वेळी वारकऱ्यासह सर्व उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले .

पंढरपूरच्या वारीसाठी पुरुष मंडळी व महिला यांनी सुद्धा पंढरीच्या दर्शनाला जाण्यासाठी एकत्र आलेले दिसत आहे. त्याच सुमारास आगारप्रमुख आशा वासनिक , पंढरपूर बस चालक अतुल ढोके, मनोज धाडसे ,जयसिंग राजपूत, वाहतूक शाखेचे पृथ्वी राठोड अशा प्रकारे सर्वांची उपस्थिती हो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here