MHT CET LLB Result | MHT CET LLB चा निकाल जाहीर!

  • राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलकडून अधिकृत वेबसाइट – cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र सीईटी एलएलबी ५-वार्षिक निकाल २०२२ जाहीर केला आहे.
  • उमेदवार आता त्यांचा महाराष्ट्र सीईटी एलएलबी ५ (MHT CET LLB 5) वर्षाचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. महाराष्ट्र एलएलबी सीईटी २०२२ (MAH LLB CET 2022) परीक्षा २ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
  • काही परीक्षा केंद्रांवर, तांत्रिक समस्यांमुळे २७ ऑगस्ट २०२२ रोजी परीक्षा पुन्हा घेण्यात आली.
mht cet llb 2022

How to Download MHT CET 2022 Result 

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला cetcell.mahacet.org वर जा.
  • तुमच्या ३ वर्षांच्या एलएलबी किंवा ५ वर्षाच्या LLB कोर्ससाठी स्कोअरकार्ड नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • MH CET लॉ २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी तुमचा निकाल डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

MHT CET निकाल 2022 चे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आज एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षे, एमएएच एमसीए सीईटी आणि एमएएच एमबीए सीईटीच्या निकालांसोबतच उमेदवारांसाठी स्कोअरकार्डही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार वर अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. सीईटी सेल महाराष्ट्राने २ आणि २७ ऑगस्ट 2022 रोजी एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षांची परीक्षा आयोजित केली होती. MAH MCA CET परीक्षा ४,५ आणि २९ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आली. तर महाराष्ट्र एमबीए, एमएमएस सीईटी परीक्षा २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात आली.

अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here