अचलपुर विधानसभा मा. बच्चु भाऊ कडू यांनी वणी बेलखेडा ते नागरवाडी रस्त्याचे उदघाट्न केले व त्यानंतर माता दुर्गाचे पूजन करून त्यांनी आपल्या भाषणामध्ये सविस्तरपणे आपल्या कामाचे उल्लेख केले आणि गावातील नागरिकांना विकासातील अळथळे कसे निर्माण होतात व अशा विकसित कामाला राजकीयदुष्टीकोनातून न पाहता आपल्या सामाजिक विकासाचा भाग म्हणून त्या कामगिरीला साथ बजावली पाहिजे, गावातील नागरिकांनी गावातील विकासाचा मूदा असो किंवा इतर कोणतेही विकसित बाब असेल तर त्यांनी एकोपाने येऊन त्या कार्याला सहकार्य केले पाहिचे. असा संदेश त्यांनी या वेळी वणी बेलखेडा ग्रामवासीयांना सांगितले तसेच या वेळी त्यांनी विशेष भर रस्ते बांधकाम आणि घरकुळ इत्यादी. गोष्टींवर दिल्याचे दिसत आहे
मा. बच्चु भाऊ कडू यांनी सामान्य नागरिकांचे शासकीय कामे सहजरित्या करता यावे म्हणून जे कामे जिल्हास्तरीय ठिकाणी होत आहे ते कामे तालुक्याच्या ठिकाणी व जे कामे तालुका ठिकाणावर होत असेल. असे कामे गावपाळीवर आणण्याचे उपक्रम त्यांनी राबविले आहे
वणी बेलखेडा येथील प्रहार कार्य कर्त्यांनी अधिका अधिक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे कामे केले व त्यासाठी प्रहार कार्य कर्त्यांनी स्वतःहून त्यावर केलेला खर्च स्व:सामुईक पद्धतीने केले यासाठी मा. बच्चु भाऊ कडू यांनी कवतुक केले
मा. बच्चु भाऊ कडू यांनी बचत गट याच्या माध्यमातून रोजगार कसे मिळेल त्या करीता त्यांनी किराणा वाटप या माध्यमातून स्वयमरोजगार उपलब्ध करून दिले
बांधकाम,घरकुळ हे मुद्दे सुटल्या नंतर त्यांनी पुढील मानवी विकासाचा भाग म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न,आरोग्य ,शिक्षण, अशा समश्यांचे मुद्दे उचलून त्यावर विशेष भर दिले जाणार असे त्यानी सांगितले
रस्ते बांधकाम तसेच इतर कामासाठी कोट्यावधी निधीचे अचलपूर विधानसभा मध्ये मंजूर करून दिल्याबद्दल समस्त गावकरी लोकांनी त्याचे आभार व्यक्त केल्याचे दिसून येत आहे तसेच या कार्यक्रमामध्ये आदींची उपस्थिती सौ. सरपंच आरतीताई राऊत, उपसरपंच अशोक अलोणे मा.पोलिश पाटील सुनील अलोणे पोलिस कर्मचारी, मंगेशभाऊ देशमुख, प्रफुल नवघरे, अमोल शेळके, मंगेश शेळके, साहेबराव तायडे ,आदित्य ठोकळ, प्रज्वल नवघरे, सुमित शेळके आदी समस्त गावकरी लोकांनी या ठिकाणी उपसस्थिती दर्शवली.