एकनाथ शिंदे यांचा जीवन परिचय | Eknath Shinde Biography In Marathi

Eknath shine Biography in Marathi[caste, age, wife, income, daughter, rss, president, sons, qualification, date of birth, family, profession, politician party, religion, education, career, politics career, awards, interview, speech]

देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करत सर्वांनाच धक्का दिलाय. शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी विराजमाना व्हावा, हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते आणि गुरुवारी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एकनाथ शिंदेंचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदाचा प्रवास जाणून घेऊया.

एकनाथ शिंदे यांचा जीवन परिचय

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. (Eknath Shinde Biography)

eknath and fadanvish
Source : Tv9 Hindi

आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे.

सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. (CM Eknath Shinde News)

नाव (Name)एकनाथ संभाजी शिंदे
पत्नीचे नावलता एकनाथ शिंदे
जन्म दिनांक (Date of birth)9 फेब्रुवारी 1964
वय५८ वर्षे (२०२२ मध्ये)
जन्माचे ठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
शिक्षणबॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) पदवी
शाळान्यू इंग्लिश हाई स्कूल ठाणे
मतदारसंघपंचपाखाडी
व्यवसायराजकारणी
वैवाहिक स्थितीविवाहित

१९९७ मध्ये नगरसेवकपदी

सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली.

सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले.

सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले.

राजकीय ते (मंत्री होण्याचा प्रवास)

एकनाथ शिंदे यांचा . ते सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील व मराठी समाजाचे आहेत. त्याचे अकरावीपर्यंतचे शिक्षण ठाण्यात झाले. त्यानंतर वागळे इस्टेट परिसरात राहून ऑटोचालक म्हणून काम केले. वास्तविक एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला यावेळी सुरुवात केली, कारण यावेळी त्यांनी शिवसेना सरकारमध्ये सामील होऊन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

हळूहळू एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रभावी नेते बनले. एकनाथ शिंदे 1997 मध्ये ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 2001 मध्ये त्यांना महापालिकेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते बनवण्यात आले. 2002 मध्ये एकनाथ शिंदे पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि बरोबर दोन वर्षांनी त्यांना आमदार करण्यात आले.

2002 मध्ये शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर आणि 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली. एकनाथ शिंदे हे एक मोठे नेते म्हणून पाहिले जात होते. दरम्यान, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जोडी अनेकदा पाहायला मिळाली. तसेच, एकनाथ शिंदे 2014, 2009, 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर सातत्याने निवडून आले. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचा ऑटोचालक ते आमदार, मंत्री असा प्रवास झाला.

FAQ

1प्रश्न: शिंदे कुठले होते

ठाणे

2प्रश्न: एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव

3प्रश्न: एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे नाव काय

उत्तर: श्रीकांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here