हॅलो मित्रानो मी आज तुमहाला या लेखामध्ये एका खास व्यक्ती बद्दल माहिती सांगणार आहे ज्याने चित्रपटसुष्टीत आपल्या सुंदर अभनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले ते व्यक्ती म्हणजे डैनी डेन्जोंगपा तर वाळू या आपल्या लेखाकडे

डैनी डेन्जोंगपा यांचा जन्म.
Table of Contents
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज खलनायकांच्या यादीत डॅनी डेन्झोंगपा यांचे नाव समाविष्ट आहे. डैनी डेन्जोंगपा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि दमदार आवाजामुळे डैनी डेन्जोंगपा चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. डैनी डेन्जोंगपा यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1948 रोजी सिक्कीमच्या गंगटोक शहरात झाला होता.
डैनी डेन्जोंगपा यांचे खरे नाव
डैनी डेन्जोंगपा यांचे खरे नाव शेरिंग फिन्सो डेन्झोंगपा आहे, परंतु प्रत्येकासाठी त्यांचे नाव उच्चारणे थोडे कठीण होते, म्हणून जेव्हा डॅनीने बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा त्यांना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी डैनी डेन्जोंगपा हे नाव दिले होते.
डैनी डेन्जोंगपा यांचे लहान पण
डैनी डेन्जोंगपा हे अत्यंत कुशल व्यक्ती होते त्यांना लहान असताना घोड्यांवर बसणे खूप आवडायचे त्यामुळे त्यांना सैन्यात जाणे हे त्यांचे स्वप्न होते पण भारत- चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आईने त्यांना सैन्यदला भरती होऊ दिलं नाही.त्यामुळे त्यांनी आपला मार्ग सोडला आणि अभिनयाचे प्रदर्शन करण्यासाठी सिनेमाच्या दुनियेत प्रवेश केला व आज त्यांना सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे
डैनी डेन्जोंगपा यांचे शिक्षण
डैनी डेन्जोंगपा यांचे सुरुवातीचे शिक्षण सिक्कीममधून झाले. यानंतर त्यांनी बिर्ला विद्या मंदिर आणि सेंट जोसेफ कॉलेज, दार्जिलिंग येथून शिक्षण घेतले. डैनीने फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे (एफटीआयआयमध्ये) प्रवेश मिळविला. व त्यांना सुरुवातीच्या काळात डैनी डेन्जोंगपा याना हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान नव्हतं त्यामुळचे उत्तर पूर्व भारतातील असणाऱ्या डॅनी यांनी यावरही उपाय शोधला. तासनतास ते हिंदी भाषा आपल्याला कसे जमेल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले व अखेरीस त्यांनी हिंदी भाषेवर आपली पकड मजबूत केले.
डैनी डेन्जोंगपा यांचे चित्रपट करिअर
डैनी डेन्जोंगपा त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘झुरत’ या चित्रपटाने केली; व त्याचे प्रदर्शन पाहून अनेक चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळू लागली त्याचे सर्वाधिक लोकप्रय झालेले चित्रपट म्हणजे घातक या चित्रपटात त्यांनी साकारलेले ‘कात्या’ हे पात्र आजही लोकांना विसरत नाही. त्याच प्रमाणे त्यांनी अग्निपथ, हम, अंदर बाहर, चुनौती, क्रांतीवीर, अंधा कानून, घातक’ आणि इंडियन या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात बसले आहे.
या व्यतिरिक्त ते गायन, चित्रकला यांसारख्या कलांमध्येही पारंगत आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 190 चित्रपट केले,
डैनी डेन्जोंगपा यांचे काही चित्रपट
डैनी डेन्जोंगपा याना मिळालेले पुरस्कार
- सन 1992 मध्ये, ‘सनम बेवफा’साठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
- सन 1993 मध्ये, डॅनीला ‘खुदा गवाह’ साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
- 2003 मध्ये त्यांना “पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
FAQ
१) डैनी डेन्जोंगपा यांचे खरे नाव काय ?
Ans: डैनी डेन्जोंगपा यांचे खरे नाव शेरिंग फिन्सो डेन्झोंगपा आहे
२) डैनी डेन्जोंगपा यांचा जन्म ?
Ans: डैनी डेन्जोंगपा यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1948 रोजी सिक्कीमच्या गंगटोक शहरात झाला होता.
३) डैनी डेन्जोंगपा याना मिळालेला सर्वोच पुरस्कार ?
Ans:डैनी डेन्जोंगपा याना 2003 मध्ये “पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
निष्कर्ष
आजच्या लेखामध्ये डैनी डेन्जोंगपा यांचे जीवन परिचय पाहिले आहे. मला आशा आहे की आपल्याला डैनी डेन्जोंगपा Information in Marathi हे पूर्णपणे समजले आहे. मला शक्य आहे तितकी माहीती देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
आपल्याला जर या लेखामध्ये डैनी डेन्जोंगपा बद्दल माहिती योग्य प्रकारे मिळाले असेल तर सोशल मीडिया द्वारे मित्रांना हा लेख पाठवायला विसरू नका. लेख संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपली समस्या नक्कीच सोडवली जाईल.