वणी बेलखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली

संपूर्ण मानवी समाजाला समतेची शिकवण देणारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022) 14 एप्रिलला (Dr B R Ambedkar Birth Anniversary) साजरी होत आहे. दोन वर्षांनी हा दिवस धडाक्यात साजरा करण्याची आणि महामानवाला वंदन करण्यासाठी एकत्र जमायची संधी मिळत आहे. कोरोनाची निर्बंध हटल्याने यंदा आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होत  आहे.

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणि वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  जयंती निमित्य खूप खूप शुभेच्छा !  कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षा पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती  आज दि . १४ / ०४ / २०२२ ला साजरी करण्यात येत आहे

वणी या गावामध्ये सांस्कृतिक कार्य क्रम , बाल  नुत्य , तसेच वाख्यान अशा प्रकारे विविध कार्यक्रम गेल्या पाच दिवसांपासून आयोजन होत असून आज सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला सर्व लोकांनी आपली उपस्थिती मोठया प्रमाणात दर्शवलेली  दिसत आहे तसेच महान क्रांतीकारि अशोक सम्राट ,

dr. babasaheb ambedkar

व महात्मा जोतिबा फुले यांची सुद्धा जयंती मोठया थाटात साजरी झाली आहे या कार्यचे  संचालक  गावातील माजी सरपंच  सुरज चव्हाण तसेच त्यांच्या सहकार्याला युवा पिढी स्वपनील धाकडे , अविनाश वासनिक ,रोहित चव्हाण ,मोहित फुले ,प्रणय चव्हाण ,रणजित बागडे ,प्रफुल तायडे ,अभिषेक फुले ,रक्षक ननावरे ,सम्यक फुले ,अंकुश नाईक ,तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी  म्हणून फुले गुरुजी , अमृतराव फुले ,सुधाकरराव धनसांडे ,नवनीत कोठाळे ,तसेच उपसरपंच अशोक अलोणे , गावातील पोलिस पाटील सुनिल अलोणे ,आदि  सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला उपस्थिती दर्शवलेली  दिसत आहे

मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.

शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.

बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात.

आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here