महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणि वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांच्या जयंतीच्या शुभेच्छा! कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
आज दिनांक १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्य वणी या गावात मोठ्या थाटात शिव जयंती साजरी करण्यात आले आहे वणी या गावातच नाही तर सम्पूर्ण भारतात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे वणीतील समस्त लोकांनी शिवजयंती साठी आपली गर्दी जमलेली दिसत आहे.
सर्वानी आपले योगदान देऊन शिवाजीमहाराजांच्या उत्सव आपल्या गावातील प्रमुख लोकांनी सुद्धा आपले सहकार्य सामर्ध्याने साकारलेले दिसत आहे तसेच गावातील सरपंच मा अतुल राऊत व,उपसरपंच मा अशोकराव अलोणे मंगेशभाऊ देशमुख , नंदकिशोर कोठाळे, प्रवीण कोठले ,सुरेश अलोणे , नागरवाडीतील सहकार्य बंधू तसेच समस्त ग्रामवासी लोकांनी प्रभात फेरी मध्ये भाग घेऊन एकतेच प्रमाण दिलेलं आहे आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात व फटाक्यांची आतषबाजीत करीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ढोल ताशांच्या तालावर तरुणाई थिरकतांना दिसत होती.शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती.
शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला. हा दिवस म्हणजेच (Shiv Jayanti) शिवजयंती अथवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंती नेमकी कधी साजरी करावी आणि महाराजांची जन्मतारीख कशी ठरवावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 1966 साली समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार आणि भविष्यात हा वाद टाळण्यासाठी शासनाने 2001 साली 19 फेब्रुवारी ही तारीख शिवजयंती साजरी करण्यासाठी जाहीर केली होती. त्याच अनुशंगाने आता गाव खेड्यातील गल्ली-बोळापासून ते राजधानी दिल्ली पर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रमातून शिवरायांच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे. काळाच्या ओघात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून काही निर्बंध असले तरी शिवभक्तांचा उत्साह मात्र कायम आहे.