Morshi : रिद्धपूर येथे दि. ४/०३/२०२१ रोजी मध्यरात्री काही समाजकंठकांनी सामाजिक भावना भडकविन्याच्या उद्देश्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शेन माती लावली होती.
तसेच रिद्धपूर हे गाव आपल्या इतिहासातील एक महत्वाचे स्थान ठरले असून त्या गावामध्ये काही मूर्खलोकांनी दुसकर्म केल्याचे दिसत आहे
ज्या महा मानवाने समाजाला जगण्याचा मार्ग तसेच आपले अधिकार मिळवून दिले आहे अशा महामानवांच्या प्रतिमेला नाही तर त्याने स्वतः च्या माणुसकीचा बहिष्कार केला आहे अशा लोकांना तातडीने शिक्षा झाली पाहिजे त्या अनुषंगाने रिद्धपूर या गावातील सचिव यांच्या कडे ३ महिने अगोदर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी , पंचायत समिती , मोर्शी .यांनी रिद्धपूर ग्रामपंचायत सचिव , याना तात्काळ

सीसीटीव्ही बसविण्यात यावे असे आदेश दि . १४/१२/२०२१ रोजी लेखी पत्राच्या माध्यमाने दिले होते . परंतु ग्रामपंचायत सचिव यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात न घेता आदेशावर कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारा वरील प्रकार घडला .
वरील समजातील लोकांनी असे घडू नये म्हणून आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही महामानवांच्या पुतळ्याला शेण माती लावणे हे चुकीचे आहे तसेच या प्रकरणाचे तपास काढण्यासाठी आंबेडकरी संघटनानी चांदुर बाजार पोलिस टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे अद्याप तपास चालू आहे
स्थानिक लोकांनी पुतळा स्वच्छ करण्याचा निर्णय केला आणि दूध आणून भौद्ध भिक्षू यांच्या हस्ते दुग्धाभिकेष करण्यात आला. एखादा पुन्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुर्वस्थितीत करण्यात आला .