लवकरच सुरु होणार पोलीस भरती 2022! ७२३१ पदांच्या पोलीस भरतीला मान्यता, जाहिरातीची प्रक्रिया सुरु

Police Bharti 2022 Maharashtra New Update 

राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. आजच, 21 सप्टेंबर २०२२ रोजी CMO महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित माहितीनुसार सध्या ७२३१ पदाच्या पोलीसभरतील मान्यता मिळाली आहे. तसेच या भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तेव्हा लवकरच जाहिरात प्रकाशित होणे अपेक्षित आहे.

राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरूणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. २०१९ मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्तपदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. २०२० मधील सात हजार २३१ तर २०२१ मधील १२ हजार ५२७ पदांची भरती दोन टप्प्यात केली जाणार आहे. राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सुरु आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ‘महाआयटी’कडून सुरु आहे. काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानंतर ऑक्टोबर (पुढील महिन्यात) भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. २०२१ मधील रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशीही शक्यता आहे.

police bharati

भरतीचे संभाव्य नियोजन आणि टप्पे …

 1. ७२३१ पदभरतीला शासनाची मान्यता (नक्षलग्रस्त गडचिरोली भागात २८९ व एसआरपीएफ बल क्र. १३मधील ५४ पदांचा समावेश)
 2. पहिल्या टप्प्यातील पोलिस शिपाई भरती ऑक्टोबर २०२२ मध्ये होणार
 3. २०२१ मध्ये पोलिस शिपाई १० हजार ४०४ तर चालक एक हजार ४०१ आणि सशस्त्र पेलिस शिपायांची ७२२ पदे रिक्त झाली असून त्याची दुसऱ्या टप्प्यात भरतीची शक्यता
 4. २०१९ मध्ये भरती झालेल्यांचे प्रशिक्षण डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होईल; पहिल्यांदा २०२० मधील रिक्त पदांची भरती
 5. ऑक्टोबरमधील भरती झालेल्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, त्यावेळी २०२१ मधील रिक्तपदांची भरती होईल

Maharashtra Police Bharti 2022

राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

 • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे.
 • मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 • तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे.
 • त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
 • तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 • याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here